सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - राजमाता जिजाऊ जन्मोत्सव
News24सह्याद्री -
स्वराज्याचे दोन ढाणेवाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ. त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडविला राजा रयतेचा.. रचली स्वराज्याची गाथा दैवत असेल ती राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ.. स्वराज्याचे दोन ढाणेवाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ... ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमूल्य साथ दिली, आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ,,, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ... मासाहेब जिजाऊ बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच.. त्यांच्या महती चे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.
ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याचे दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या या माऊलीची जीवनगाथा देखील तितकीच अगाथ आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाचे वंशज असलेल्या देवगिरीचे सम्राट यादवरावांच्या घरांमधील पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांना 12 जानेवारी १५98 रोजी सिंदखेड राजा येथे कन्यारत्नाचा लाभ झाला. लहानपणापासूनच जिजाऊ अगदी हुशार होत्या त्यांच्या बोलण्या वागण्यातील धीटपणा सहज दिसून येत असे.. ही पोर पुढे जाऊन नक्कीच काहीतरी विलक्षण करणाऱ्या हे तेव्हाच लखुजी जाधव यांच्या लक्षात आले होते. वयात आल्यावर लखुजी जाधव आणि त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या भोसले घराण्यातील शहाजीराजांसोबत जिजाऊंचा विवाह लावून दिला शहाजीराजा सारखा शूर पराक्रमी ऐश्वर्यसंपन्न पती आपल्याला लाभला याचे जिजाऊंना तेवढे कौतुक होते पण सोबतच त्यांना हे देखील ठाऊक होते की अशा विराला जन्मभर सोबत करणे म्हणजेच निखाऱ्यावर चालण्यासारखे आहे कधी दैवगती फिरेल आणि भोग नशीब येतील हे सांगता येणारे नव्हते. आणि त्याचा प्रत्यय जिजाऊंना लवकरच त्याला राजकीय बेबनावापुढे लखुजी जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यात वैर निर्माण झाले या प्रसंगातून स्वतःला सावरत जिजाऊंनी मात्र सासरकडची बाजू घेतली आणि लग्नानंतर मरेपर्यंत पतीला सोबत करण्याची शपथ त्यांनी पाळली.
शहाजीराजे पराक्रमी असले तरी त्यांचे स्वतःचे साम्राज्य नव्हते मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी शहाजीराजांनी केलेली धडपड जिजाऊंनी स्वतः पाहिली होती तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी स्वराज्यनिर्मीतीच्या ध्येयाची बीज रूजले. भावना आणि नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला. जिजामाता ना एकूण आठ मुले झाली त्यात सहा मुली आणि दोन मुलं, आऊ साहेबांनी आपल्या दिराच्या नावावरून आपल्या मोठ्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. संभाजी महाराज शहाजी राजांजवळ वाढले. पुढे 19 फेब्रुवारी सोळाशे 30 ला शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या समयाला जिजामाता ला पुत्ररत्न प्राप्त झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . शिवाजी राजे थोडे मोठे झाल्यावर जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली आणि स्वराज्य काय असते त्याचे धडे देण्यास सुरुवात केली .थोडे मोठे झालेले शिवराय युद्ध कलेमध्ये पारंगत झाले होते त्यांच्याकडे पाहिल्यावर आपले स्वराज्य निर्मितीचे ध्येय माझा हाच पुत्र साकार करू शकतो याची त्यांना खात्री पटली.
धडाडी, कणखरपणा, धैर्य हे जिजाऊंचे गुण शिवरायांनी आत्मसात केले होते जिजाऊंचे निपक्षपाती न्यायदान, कर्तव्यकठोर स्वभाव, प्रजे बद्दलचे ममत्व हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा त्यांना स्रियांच्या बेअब्रूची असलेली चीड या साऱ्या गोष्टी शिवरायांच्या मनावर परिणाम करत होत्या आणि हळूहळू शिवराय घडत होते. जिजाऊंनी त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याच्या केवळ 36 खेड्यांच्या जहागिरीवर स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली अवघ्या मावळ प्रांतातल्या गोरगरीब सामान्य रयतेच्या त्या माऊली अन् सावली झाल्या.सर्वांवर त्यांचा मायेचा हात होता शहाजीराजांची कैद व सुटका अफझल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशाच राज्यांवर असलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. शिवराय स्वतः मोहिमांवर गेले असता जिजाऊ स्वतः स्वराज्याचा गाडा हाकीत असत. ज्या दिवशी स्वराज्यनिर्मीतीच्या ध्येयाचे बीज त्यांच्या मनात रूजले तेव्हापासून ज्या क्षणाची त्या आतुरतेने वाट बघत होत्या तो क्षण अखेर आला आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटले.
6 जून १६74 रोजी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्यभिषेक झाला . 17 जून १६74 बुधवार रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचे निधन झाले. आपल्या मुलाचा हिंदू नरपती म्हणून झालेला राज्याभिषेक पाहून ती माऊली कृतार्थ झाली. आणि आपले जीवन कार्य संपवून स्वर्गाच्या वाटेवर निघाली आणि स्वराज्याच्या स्वामी सह अवघा स्वराज्य पोरका झाला. जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला स्वराज्य निर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा...
No comments
Post a Comment