Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - गावकारभाऱ्यांसाठी आज चुरशीची लढत

No comments

              News24सह्याद्री - गावकारभाऱ्यांसाठी आज चुरशीची लढत...पहा सह्याद्री special रिपोर्ट




TOP HEADLINES

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा आज शांत होणार आहे. ही निवडणूक म्हणजे गावातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची निवडणूक. प्रत्येक गावातलं वातावरण याकाळात काही वेगळेच झाल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळत असतं. अहमदनगर जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. सुमारे पाच हजार 788 जागांसाठी तेरा हजार 194 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 14 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून नवीन गाव कारभारी निवडून देणार आहे.  तर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील तीन मंत्री आणि आमदार खासदारांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने सर्वच ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या आहेत.  

यासाठी पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असून साडेतीन हजार पोलिसांचा ताफा या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे. यामध्ये 125 अधिकारी आहे तर दोन हजार पोलिस आणि तेराशे होमगार्ड संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्तासाठी राहणार आहे. 2553 मतदान केंद्रावर 519 अधिकारी तर 15,164 कर्मचारी तैनात असतील . आज मतदान झाल्यानंतर 18 जानेवारीला कोन राहतील गावाचे कारभारी याचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आज होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेक दिवसांपासून तयारी झाली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गावागावात निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे हेच एकंदर आजवरच्या चित्रावरुन  स्पष्ट होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *