Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - 'या' मुळे म्हणतात मकर संक्रांती

No comments

             News24सह्याद्री - 'या' मुळे म्हणतात मकर संक्रांती...पहा सह्याद्री special रिपोर्ट





'मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस 'मकर संक्रांती' असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे महाराष्ट्रात मकरसंक्रात तामिलनाडुत पोंगल गुजरात व राजस्थानमध्ये  उत्तरायण  पंजाब मध्ये लोहढी ओडिसात माघमेला आसाम भोगाली बिहु, तर कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांती ,  अशी विविध नावं या सणाला आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत अतिशय महत्वाचा सण असुन शेतीशी देखील संबंधीत आहे. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. 

सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते  असं म्हणतात की या रथसप्तमीपासुन सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला सुरूवात करतात. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. गुळाची पोळी आणि तीळगुळ याचे या दिवशी विशेष महत्व असते. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बोरन्हाण आणि तिळवण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते वयाच्या पाच वर्षांपर्यंत लहान मुलामुलींना या मकरसंक्रांतीच्या काळात बोरन्हाण घालण्याची परंपरा फार पुर्वीपासुन सुरू असल्याचे आपल्याला दिसते .लहान मुलांना काळे कपडे घालुन, हलव्याचे दागीने घालुन सजवतात आणि हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बोरं, हलवा, याचे मिश्रण त्यांच्या डोक्यावर टाकतात. आधुनिक काळात चाॅकलेट, बिस्कीटे, लहानांचे आवडते जिन्नस देखील त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात.

 नवे लग्न झालेल्या नववधुचे हळदीकुंकु या दिवसांमध्ये पहिल्यांदा मोठया प्रमाणात हौसेने करतांना आपण पाहातो याकरता तीच्यासाठी काळी साडी, हलव्याचे दागिने तसेच या पद्धतीनेच विविध आभुषणं घालुन तिला सजविले जाते. निवांत वेळ  काढून आपण देखील सणाचा हा आनंद घेतो त्यात रममाण होतो भेटीगाठी होतात आणि सण-उत्सव यापासून मिळालेली ऊर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येते आणि म्हणूनच आपण प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला पाहिजे या स्पेशल रिपोर्ट मध्ये आता इथे थांबतोय तुम्हासर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *