मोठी बातमी - श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द
News24सह्याद्री -
महाराष्ट्रा मध्ये आपल्या वक्त्यव्याने वादात सापडलेला अहमदनगर महानगर पालिकेचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद औरंगाबाद हायकोर्टाने रद्द केले आहे,,छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या विरोधात, महानगर पालिकेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सभेमध्ये त्याच पद रद्द करावं असा ठराव मंजूर केला होता. हा ठराव नगर विकास खात्याकडेही पाठवण्यात आला होता. तिथून या ठरावाला हिरवा कंदील भेटल्यानंतर श्रीपाद छिंदम याने या ठरावा विरोधात औंरंगाबाद हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाल्या नतर कोर्टाने श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता नगर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पुन्हा पोटनिवडणूक लागू शकते.
No comments
Post a Comment