मोठी बातमी - शनिवार पासून प्रत्यक्ष कोरोना लसीकरणास सुरुवात
News24सह्याद्री -
ज्या दिवसाची वाट पाहत होत ती कोरोना लस आज नगर मध्ये पोहचली असून हि लस जिल्हापरिषदेतील लस कक्षात ठेवण्यात अली आहे. कोरोना लसीचा ड्राय रान यशस्वी झाल्या नंतर आता शनिवार पासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात २१ ठिकाणी लसीकरण केंद्र असून पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३१ हजार ९२१ सरकारी खाजगी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांना हि लस देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी या लसी बाबत अधिक माहिती दिली आहे. महानगर पालिकेच्या हद्दीत आठ ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करण्यात अली आहे. त्यामुळे आता लसीची प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्षात ती लस घेता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाने या लसीकरणा बाबत जय्यत तयारी केली असून अवघ्या काही दिवसावर हि लस आता प्रत्यक्ष मिळणार आहे
No comments
Post a Comment