मोठी बातमी - पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी परिसरात कोंबड्या मृत झाल्याने खळबळ...
News24सह्याद्री -
कुठे तरी कोरोना कमी होताना दिसत असतानाच आता पुन्हा बर्ड फ्लू चा शिरकाव महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात झाल्याचं दिसून येतेय अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी या गावात काही कोंबड्या अचानक मृत झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे सध्या बर्ड फ्लू ने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने कुक्कुटपालन कारण्याऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे लॉकडाऊन नंतर कुठेतरी कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरळीत झाला असतानाच बर्ड फ्लू मुळे या व्यवसायाची पुन्हा आता कंबर मोडण्याची चिह्ने दिसून येत आहेत त्यामुळे कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
डोळ्यादेखत आपण पालन केलेल्या कोंबड्या मरत असताना पाहणे यापलीकडे हातात काहीच राहिले नसल्याचे चित्र सध्या दिसून येतंय या बाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून जिल्हाधिकारी DR राजेंद्र भोसले यांनी या बाबत संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून जिलाधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत तर मिड सांगावी येथील कोंबड्या नक्की कोणत्या रोगाने मृत झाल्या हेत या बाबत भोपाळ येथील प्रयोगशाळेतुन आवहाल आल्यानं तरच खरे कारण समजू शकेल अशी माहिती पतरंडीचे पशुवैधकीय अधिकारी जगदीश पालवे यांनी दिलीय
No comments
Post a Comment