गॉसिप कल्ला - मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली मने
News24सह्याद्री - मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली मने....पहा गॉसिप कल्ला
1. जान्हवी कपूर नंतर आता धाकटी बहीण खुशी ही देखील बॉलिवूडमध्ये
अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने काही काळापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. धडक या तिच्या पहिल्या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं.आता तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची धाकटी बहीण खुशी ही देखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती तिचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी दिली आहे.
2. विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू, चाहत्यांमध्ये क्रेझ
साऊथचे सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षीत 'लायगर' या सिनेमाचा फर्स्ट लूक काल सोमवारी रिलीज करण्यात आला आणि हा लूक पाहून विजय देवरकोंडाचे चाहते अक्षरश: सैराट झालेत. चाहत्यांनी असे काही केले की, सगळेच थक्क झालेत. साऊथच्या क्रेजी चाहत्यांनी फटाके फोडले, काहींनी केक कापला, काहींनी या विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू काढला.
3. कंगना राणावतच्या आगामी 'धाकड'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी 'धाकड' चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून आला. आता या बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या 2 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टिझरवरून हा एक ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही.
4. मृण्मयी देशपांडेनी प्रेक्षकांची जिंकली
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे छोट्या पडद्यावरील मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. तिने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सोशलवर ती नेहमीच सक्रिय असून नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो आहे.
5. अभिनेता कमल हासन रुग्णालयात भरती
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात कमल हासन यांच्या दोन मुली अभिनेत्री श्रुति हासन आणि अक्षरा हासन यांनी माहिती दिली आहे.ते पुढील चार ते पाच दिवसांत घरी परत येतील.
No comments
Post a Comment