चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये - के. पी. शर्मा ओली
मुंबई -
भारत आणि नेपाळ मध्ये लक्ष घालू नये. नेपाळमधील राजकीय गोंधळादरम्यान कार्यकारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भूमिका दिवसोंदिवस मवाळ होताना दिसत आहे. चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहे, असे ओली यांनी म्हटले आहे. नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्या मध्ये येऊ शकत नाही असे म्हटले आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.
ओली यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो असंही म्हटले आहे. नेपाळ आणि भारताचे खूप चांगले संबंध असल्याचंही ओली यांनी अधोरेखित केले आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार ओली सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ओली यांनी यांच मुलाखतीमध्ये नेपाळच्या जनतेला संदेश देताना नेपाळच्या हितापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त महत्वाची नसल्याचे म्हटले आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरु आहे. भारतासोबत सुधारलेले संबंध आणि कोरोना लसीच्या जोरावर पुन्हा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची रणनीती ओली यांनी आखल्याचे राजकीय जाणकार सांगतात. सध्या नेपाळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याने, ओली यांचे हे वक्तव्य एक नियोजित धोरणांनुसार केलेले वक्तव्य असून सध्या नेपाळला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहे.
No comments
Post a Comment