Breaking News

1/breakingnews/recent

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

No comments



मुंबई -

ड्रायफ्रुटसमधील महागडा असा प्रकार म्हणजे पिस्ता  हिरव्या रंगाचा पिस्ता क्रिम कलरच्या टणक आवरणात असतो. ते टणक आवरण फोडून पिस्त्याचा गर खाल्ला जातो. पिस्ता आवडतो म्हणून तुम्ही खाता खरा पण तुम्हाला पिस्त्याचे विविध फायदे माहीत आहेत का? काय नाही? आज आम्ही तुम्हाला पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत. जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. शिवाय या सोबत आम्ही तुमच्यासोबत पिस्त्याच्या रेसिपी शेअर करणार आहोत ज्या तुम्ही कधीही करु शकता आणि पिस्त्याचे भरपूर फायदे मिळवू शकता. मग करायची सुरुवात?तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीही पिस्ता वरदान आहे. एका अभ्यासानुसार साधारण मुठभर पिस्ता खाल्ल्याने तुम्हाला अपचनासंदर्भात असलेल्या तक्रारी दूर होतात, असे समोर आले आहे. पिस्ता तुमच्या पोटातील अपायकारक बॅक्टेरियाला मारते. त्यामुळेच तुमची पचनशक्ती सुधारते. पिस्तामध्ये असलेले व्हिटॅमिन B6,कॉपर, मॅगनीझ, फॉस्फरस तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते. पिस्ताच्या नित्यसेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण पिस्तामध्ये असलेले फायबर विष्ठा अगदी सहजपणे शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात. पिस्ता शरीरासाठी चांगला आहे म्हणजे पिस्त्यामध्ये असे आहे तरी काय? असा तुम्हाला प्रस्न पडला असेल तर पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई  व्हिटॅमिन बी प्रोटिन फायबर अँटिऑक्सिडंट आणि पोटॅशिअम  असते. हे घटन आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात. त्यामुळे पिस्त्याचे सेवन अत्यंत महत्वाचे असतेआता ड्रायफ्रुट म्हटले की, त्यात फॅट आले ड्रायफ्रुटच्या सेवनाने वजन कमी झाले असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नसेल तर पिस्त्याच्या बाबतीत ते अगदी खरे आहे. तुम्ही आवश्यक इतक्या प्रमाणात पिस्त्याचे सेवन केले तर तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. कारण पिस्त्याच्या सेवनामुळे पोट लवकर भरते. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी खाण्याची इच्छा लवकर होत नाही. वजन वाढण्याचे मुख्य कारण असते नको त्यावेळी नको ते खाणे तेच खाणे कमी करण्याचे काम पिस्ता करु शकते. पण पिस्ता किती खावा याचेही प्रमाण आहे.

१. ह्रदयविकारापासून सुटका
तुमच्या आरोग्यासाठी घातक असते ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. अरबटचरबट घाण्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याचा परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणजे ह्रदयविकारांची शक्यता वाढू शकते. तुमच्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म पिस्त्यामध्ये असतात. पिस्त्यामुळे तुमच्या शरीराला नको असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. हे अनेक अभ्यासांमधूनही समोर आले आहे.

२. डाएबिटीस ठेवते नियंत्रणात
पिस्ता डाएबिटीसाठीही चांगले असते. जर तुम्हाला डाएबिटीसचा त्रास असेस तर तुम्ही पिस्त्याचे हमखास सेवन करायला हवे. पिस्ता तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते आणि तुमचे डाएबिटीस कंट्रोलमध्ये राहते. याशिवाय पिस्त्यामध्ये असलेले फायबर डाएबिटीसच्या रुग्णांसाठी लाभदायक असतात.

३.  त्वचेसाठी आवश्यक
पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन E असते. जे तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले फॅट तुम्हाला पुरवते. त्यामुळे तुमची त्वचा तजेलदार राहते. तुमच्या त्वचेच्या तक्रारीदेखील कमी होतात. याशिवाय पिस्ताच्या त्वचेसाठीचा फायदा सांगायचा झाला तर सूर्यांच्या अतिनील किरणांपासून वाचवण्याचे काम पिस्ता करते. या शिवाय त्वचेच्या कॅन्सरपासूनही पिस्ता संरक्षण करते

४. प्रतिकारशक्ती वाढवते
कोणत्याही आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन B6 हे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पिस्त्यामध्ये मुबलक प्रमाणात हे व्हिटॅमिन असते. त्यामुळे तुमच्या नित्यसेवनात पिस्ता असावा.

५. डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पिस्त्याचे आणखी एक वैशिष्टय असे की, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.  ल्युटेन (Lutein) आणि झेक्झानथिन (Zeaxanthin) हे दोन मुख्य घटक पिस्त्यामध्ये असततात. जे डोळ्यांना होणाऱ्या विकारापासून दूर ठेवतात. शिवाय वयपरत्वे होणारा दृष्टिदोषाचा त्रासही पिस्त्याच्या सेवनामुळे कमी होतो असे अमेरिकेतील एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

६. संसर्गापासून संरक्षण
संसर्गापासून संरक्षण कऱण्याचे कामही पिस्ता करत असते. तुमची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे तुम्हाला आजारापासून दूर ठेवण्याचे काम पिस्ता करत असते. या शिवाय जर तुमच्या शरीराला सूज आली असेल तर ते बरे करण्याचे काम देखील करत असते.

७. शरीरातील उर्जा वाढवते
तुमच्या शरीराला आवश्यक असलेली उर्जा देखील पिस्तामधून मिळते. समजा तुम्ही 100ग्रॅम पिस्त्याचे सेवन केले. तर तुम्हाला साधारण 500 ते 525 कॅलरीज मिळतात. पिस्त्यामध्ये असलेल्या कॅलरीज उर्जा तर देतात. या शिवा त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेटस, फॅट, प्रोटिन,फायबर, कॅल्शिअम, झिंक हे घटक देखील तितकेच उर्जावर्धक असतात. ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटते

८. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते
आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते.  हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे मेटालप्रोटिन आहे ज्यामध्ये लोह असते आणि ते शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. शिवाय तुमच्या शरीराचे कार्य अगदी सुरळीत चालते. तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन पुरवण्याचे काम व्हिटॅमिन B6 करते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B6चे प्रमाण अधिक आहे. पिस्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन वाढते शिवाय त्याची मदत हिमोग्लोबिन 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *