गॉसिप कल्ला - विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो
News24सह्याद्री - विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो....पहा गॉसिप कल्ला
1. विरुष्काच्या बाळाचा पहिला फोटो
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी सोमवारी दुपारी चिमुकल्या पाहूनीच आगमन झालं आहे . विराट कोहलीने सोमवारी ट्विटवरून ही गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. विरुष्काच्या बाळाचा असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, विराट कोहलीच्या भावाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे पाय दिसत आहेत. तर भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगटला देखील पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. बबिताने पती विवेक सुहाग याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
2. अदा शर्मा समुद्रकिनारी, कार्टव्हील उडी पाहून चाहते हैराण!
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत राहते. अदा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच अदाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची सहावारी साडी घातलेली आहे आणि साडीवर ती कार्टव्हील उडी मारताना दिसत आहे.अदाचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यापासून चाहत्यांनी त्यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
3. ड्रेसिंग सेन्सनेही प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण कियारा अडवाणी
आपल्या अभिनयाबरोबरच ड्रेसिंग सेन्सनेही प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारी .बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. अक्षय कुमार ते शाहिद कपूरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी कियारा सध्या मालदीवच्या सुट्टीमुळे चर्चेत आहे. ती बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत गेली होती. मालदीवमधील फोटो शेअर केल्यानंतर ड्रेसिंग सेन्समुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आउटिंगसाठी बाहेर पडलेली कियारा लव्हेंडर कलरच्या सुंदर आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत होती.
२०१८ मध्ये, आदित्य धर दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रू वाला निर्मित आणि विकी कौशल अभिनित 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट आपल्या सर्वांच्या चांगला च लक्षात असेल. आता हे त्रिकुट आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाचं नाव आहे 'अश्वत्थामा'.
महाभारताच्या अध्यायातील एका पात्रावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे .विक्की कौशलनं 'अश्वत्थामा' हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणून वर्णन केलं आहे. आदित्य आणि रॉनीबरोबर पुन्हा काम करणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
No comments
Post a Comment