अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट
मुंबई -
क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं नुकतंच आगमन झालंय. कन्यारत्न झाल्यावर विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्यात. मात्र या शुभेच्छा त्यांनी हटके पद्धतीने दिल्यात. अमिताभ यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय . या फोटोत भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंची नावं होती.विशेष म्हणजे या यादीत अशाच क्रिकेटपटूंची नावं होती ज्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही यादी धोनी, रैना यांच्यापासून सुरू झाली. यात रोहित, शमी, अश्विन, अजिंक्य रहाणे या साऱ्यांचीही नावं आहेत. या यादीच्या शेवटी विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. आणि, भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं त्यांनी त्या ट्विट मध्ये लिहिलं आहे. इतकंच नव्हे, तर अमिताभ यांनी फोटोसोबत कॅप्शन जोडलं असून त्यात धोनीची मुलगी या संघाची कर्णधार असेल का ? असा मजेशीर सवालहि केला आहे.
No comments
Post a Comment