21 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार
गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे
2. उदगीर दगडफेक प्रकरणी पाच जण अटकेत
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात झालेल्या दगडफेकीत पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. साबेर याहिया पटेल, मुसा बागवान, मिर्झा पाशा बेग, शादुल निजाम शेख,अमीर अब्दुल रज्जाक चाऊस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
3. गडचिरोलीत दारूमुळे दोघांनी गमावला जीव
विषारी दारू प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, गडचिरोलीमध्ये अनेक गावांत दारूबंदी आहे. तरीही असा प्रकार समोर आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
4. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’
भारतीय सैन्य किंवा निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांना देखील अद्याप मिळालेला नाही. हा विक्रम आपल्या नावावर होण्यासाठी पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतलीय. त्यामुळे त्यांचं देशभरातून कौतुक होत आहे. त्यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली
5. टिटवाळा पोलिसांनी वाचवला महिलेचा जीव
पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला असून महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच या घटनेचा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर टाकून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक केले आहे.
6. देव देवतांचा अवमान करणारे 'तांडव' वेबसिरीज बॅन करा
हिंदु देव देवतांचा अवमान करुन समाजात तेढ निर्माण करणा-या तांडव वेबसीरीज च्या विरोधात गुन्हा दाखल करुन हि सिरीज त्वरित बंद करण्यात यावीअन्यथा भाजपाच्या वतीने शहरात आंदोलन छेडण्याचा ईशारा भाजपाच्या अँडव्होकेट राखी बारोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे दिला.
7. अकोल्यातील आनंद अनाथ आश्रमात विजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
अकोला येथील गुडधी रोड येथे असलेल्या आनंद अनाथ आश्रम मध्ये राहणारी अनुराधा वानखडे तिला घराच्या छतावर विजेचा धक्का लागल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु तिची अवस्था गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. 31 जानेवारीला अनुराधा हिचा विवाह होणार होता.
8. साष्ट पिंपळगाव येथील गावकऱ्यांचे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन
गावातील अबाल वृद्धासह हजारो महिलाही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन स्थगित केले जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
9. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा अकोल्यात गौरव
अकरा जणांचा 'समाजवीर' आणि तीन जणांचा 'जीवनगौरव' पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महापालिका आयुक्त संजय कापडनीस, तामिळनाडूचे माजी प्रधान सचिव विश्वनाथ शेगांवकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
10. दिग्दर्शक अली अब्बास झफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'तांडव' या वेबसीरिजमधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिग्दर्शक अली अब्बास झफर आणि या वेब सीरिजचे निर्माता, लेखक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा देत तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
No comments
Post a Comment