15 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क करायचा मोबाईलची चोरी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. कोरोना महामारी आणि लसीकरणासाठी २४ तास कॉल सेंटर
पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, कोविड 19 साथीचे रोग आणि लसीकरणाविषयी माहिती मिळावी यासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू केले आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीकरणाबाबत विविध माहिती साठी 1075 हा नंबर सर्वांसाठी देण्यात आला आहे.
2. देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार
लोकसभा सचिवालयाने सांगितले आहे की, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.
3. कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीच्या समितीतून भूपेंद्रसिंग मान बाहेर
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि सरकारमध्ये बातचीत करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केलीय. त्या समितीतूनच आता भूपेंद्रसिंग मान बाहेर पडलेत.
4. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीचा कौल सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचा असेल.
5. राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर
यंदाही राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
6. समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे
दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एनसीबी समीर खान यांना अटक केली. त्यानंतर चौकशीमध्ये समीर खानविरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे असल्याचं सूत्रांनी सांगितलंय
7. डोंबिवलीत सुरू झाली सहावी माणुसकीची भिंत
ऐकून १० प्रभाग क्षेत्रात अशीच माणुसकीची भिंत उभारणार असल्याचे केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले व कल्याण-डोंबिवलीकरही गरजूंना मदतीसाठी पुढाकार घेत असल्याचे ई प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडदे यांनी सांगितले.
8. गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क करायचा मोबाईलची चोरी
सागर साळवे आणि निलेश भालेराव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून 26 मोबाईल आणि 3 दुचाकी असा 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
9. मुरमी येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु
निरीक्षक गुरमे यांनी घटनास्थळी धाव घेत इंगळे यांना पोलिसांच्या वाहनात बसवुन पोलिस ठाण्यापर्यंत आणले. यानंतर रुग्णवाहिकेतुन पोना. इंगळे यांना उपचारासाठी सिग्मा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले.
10. ऑस्ट्रेलिया कि टीम इंडिया, कोण जिंकणार मालिका ?
टीम इंडिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे हा चौथा सामना चुरशीचा आणि निर्णायक होणार आहे.
No comments
Post a Comment