Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु

No comments

    News24सह्याद्री सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु....पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES


1. सुशांतचे स्वप्न पूर्ण करणार दिग्दर्शक अभिषेक कपूर 
सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला आहे. त्यांनी सुशांतच्या वाढदिवशी झाडे लावण्याचे नियोजन केले असून ते आज 1000 झाडे लावणार आहेत.  

2. भारतातल्या लॉकडाऊनवर पहिला चित्रपट
मधुर भंडारकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात प्रितीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, सई ताम्हणकर, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

3. गायिका प्रियंका बर्वेने शेअर केला मुलाचा व्हिडिओ 
प्रियंकाने नुकताच एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या एखाद्या स्टुडिओमधील रेकॉर्डिंगचा नाही, तर तिच्या मुलासोबत गातानाच आहे. सोशल मीडियावर प्रियंकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओला अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.  

4. सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता. त्याची हीच मदत लक्षत घेऊन हैदराबाद मधील व्यक्तीने एका अनोख्या पद्धतीने त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केलीय.  याचे उद्घाटन करण्यासाठी स्वत : सोनू सूद उपस्थित होता.  

5. 'धाकड' मध्ये दिव्या दत्ताचा अनोखा लूक 
फोटोमध्ये दिव्या सोनेरी किनार असलेल्या हिरव्या साडीमध्ये बसलेली दिसते आहे. ती ज्या पद्धतीने बसली आहे, ते पाहता ती एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखी दिसते असून  या सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेचे नाव रोहिणी असणार आहे. धाकड' या वर्षी 21 ऑक्‍टोबरला रिलीज होणार असून दिव्या एका खलनायिकेच्या रूपात आपल्याला पाहायला  मिळणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *