Breaking News

1/breakingnews/recent

बिग बॉसच्या घरात सलमानने केली साफसफाई

No comments


 मुंबई -

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलामान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. शोमधील स्पर्धक निक्की तंबोळी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद हे सुरुच असतात. पण विकेंटच्या डावामध्ये असे काही झाले आहे की खुद्द सलमान बिग बॉसच्या घरात साफसफाई करण्यासाठी पोहोचला आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या भागामध्ये सलमान खान निक्की तंबोळीला बेडरुममधील राखी सावंतच्या बेडची साफसफाई का केली नाही? असा प्रश्न विचारताना दिसतो. त्यावर निक्की तिला राखीच्या बेडची साफसफाई करायची नसल्याचे म्हणते.निक्कीचे उत्तर ऐकून सलमानला राग येतो आणि तो मी बिग बॉसच्या घरात येऊन ते काम करतो असे बोलतो. व्हिडीओमध्ये सलमान बिग बॉसच्या घरात जाऊन साफसफाई करताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *