राजुरी शिवारात जळीत हत्याकांड
मुंबई -
राहता तालुक्यातील राजुरी शिवारात निळवंडे कालव्याच्या शेतालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. पहाटेच्या सुमारास हि घटना घडल्याचं समजतंय. सकाळी तेथून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास हि घटना आल्या नंतर लोणी पोलिसांना याबाबत कळवण्यात आल त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरु केलायराहाता तालुक्यातील राजुरी-ममदापुर शिवारात आज दिनांक १२ जानेवारी १८ ते २० वर्षीय तरुणीचा खून करून तिचा मृतदेह निळवंडे कॅनॉल परिसरात जाळून टाकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.राजुरी शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सदर तरुणी मिळून आली असून मुलीच्या डाव्या हातावर दिल आकाराचे टॅटू असून तिची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले. कोणाला ओळख पटल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
No comments
Post a Comment