शकुंतला नगरमध्ये महिलेचा विनयभंग
मुंबई -
जालना शहरातील शकुंतला नगरमध्ये 28 वर्षाच्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडलीय. आरोपी विजय कदम त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ यांच्या विरोधात जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलीये , लहाण मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने तक्रार दाखल केलेल्या महिलेला शिवीगाळ केली होती. फिर्यादी महिलेच्या पतीने आणि सासूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. असता आरोपीने शिवीगाळ करत त्या महिलेचा विनयभंग केलाय आणि मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात. यासंदर्भात जालना बाजार पोलिस ठाण्यात 354 , 354 अ, 323 ,504,या भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे
No comments
Post a Comment