बामणी पोलिसांनी कार सह देशी दारू जप्त
मुंबई -
बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या भोसी येथे दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री अल्टो कार सह देशी दारूचे चार बॉक्स जप्त केले आहे. बामणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती वरून दि. 4 जानेवारी रोजी सात वाजेच्या सुमारास भोसी गावातील विजय ठोंबरे व राम नरवाडे हे देशी दारूचे कार सह 4 बॉक्स 9984 रुपयाचे विकण्या कामी कारमध्ये बाळगले असता भोसी व पिंपळगाव रस्त्यावर मिळून आले.
त्यावरून पोलीस नाईक सतीश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लाख 9 हजार 984 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच दिनांक 3 जानेवारी रोजी कोरवाडी येथील राहुल डाखोरे व विष्णू कणसे या दोघांवर दोन ठिकाणी छापा मारून चार बॉक्स जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि कल्पना राठोड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक वाघमारे हे करीत आहेत.प्रतिनिधी बळीराज भराडे जिंतूर
No comments
Post a Comment