16 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ लसीकरण मोहिमेत सहभागी....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. खोनी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अटीतटीची लढत
देशभरात आज लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं.
५. औरंगाबादेत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरऔरंगाबादमध्ये महाविकास आघाडीत पुन्हा बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. मात्र यावेळी उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असून, पुन्हा एकदा औरंगाबादेत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
६. विदर्भातील भागांत कडाक्याची थंडी
उत्तर भारतातील थंडीची लाट पूर्व मध्य प्रदेशपर्यंत आली असल्याने त्यालगतच्या विदर्भातील भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. उर्वरित राज्यात मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा कायम आहे.विदर्भातील गोंदिया येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर मध्य महाराष्ट्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या विरून गेले आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
७. खासदार निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशी टीका केली होती. अजित पवारांनी केलेल्या या टीकेनंतर निलेश राणेंनीही यावर प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रात अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र, तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही, त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
८. नागपुरातील राजभवनाला काँग्रेस कार्यकर्त्यांचा घेराव
केंद्रातील कृषी कायदे मागे घेणाच्या मागनी घेऊन नागपुरातील राजभवनाला काँग्रेस कार्यकर्ते घेराव घालणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. राजभवनच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ काँग्रेसचा मोर्चा धडकणार आहे. सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात मुक्कामी आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फे नागपुरात आंदोलन केले जात आहे.
९. पुण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पैशांचा धुराळा
पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान झालय. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांदीच्या वस्तु, एक महिन्याचा किराण, पंधरा लिटर तेलाचे डबे, साड्यासह थेट मताला हजारो रुपयांचे वाटप करत पैशांचा अक्षरश : धुराळा उडालाय. यात शिरुर, हवेली, खेड आणि मावळ, मुळशी तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील आणि मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा निवडणूक खर्च कोटींच्या घरात गेलाय. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार 15 हजार ते 75 हजार रुपये खर्च करायला मान्यता दिली होती, मात्र आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडली आहे.
१०. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ लसीकरण मोहिमेत सहभागी
देशभरात आजपासून कोरोना लसीकरण सुरु झालं. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आणि या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाले. अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
No comments
Post a Comment