12 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - प्रदूषणाची पातळी वाढली; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
बर्ड फ्लूचं संकट महाराष्ट्रात गहिरं होत असताना परभणीत 8 हजार, तर राज्यात 80 हजार कोंबड्यांची कत्तल केली जाणार आहे. महाराष्ट्रात 1200 पक्ष्यांचा बर्ड फ्लूने घास घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने पक्ष्यांना ठार करण्याचे आदेश दिले होते. त्यातच मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गावातून कोंबड्यांच्या कत्तलीला सुरुवात होणार आहे. जवळपास वीस पोल्ट्री फार्म्समधील 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार.
2. भाजप नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
3. मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून चव्हाण दिल्लीत; मेटेंचा आरोप
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला ते दिल्लीत गेले आहेत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे
4. अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी
कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. त्यानंतर तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवण्याचा हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून निर्णय घेण्यात आला. परंतु अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी बुधवारपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येणार आहे
5. सूर्यकांत महाडिक यांचं निधन
शिवसेनेचे कट्टर समर्थक उपनेते आणि कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक यांचं चेबूर घाटला येथे दिर्घ आजाराने निधन झाले. सूर्यंकांत महाडिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी विविध कामगार यूनियनचं नेतृत्व केले. सूर्यकांत महाडिक हे जवळपास 5 हजार कामगार यूनियनचा कारभार पाहत असंत. त्यांचे वय 75 वर्ष होते
6. सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात
राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी ही टीम तयार केली आहे.
7. महाराष्ट्रातल्या आणखी एका सहकारी बँकेचं लायसन्स रद्द
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या 99 टक्के ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे.
8. हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद
राज्यभर गाजलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या न्यायालयात तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.12 आणि 13 जानेवारी रोजी इतर साक्षीदारांची साक्ष घेण्यात येणार असल्याची माहिती वकिलांच्या वतीने देण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
9. शिर्डी, पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. साईबाबांच दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पास सक्ती नाही. शिर्डीत गुरुवार,शनिवार आणि रविवारी दिवस फक्त ऑनलाईन पास धारकांना दर्शन देण्यात आले येणार आहे. . तसेच दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेण्यात आला आगे. गर्दी नियंत्रणासाठी ३ दिवस पास वितरण केंद्र बंद ठेवणार
10. प्रदूषणाची पातळी वाढली, मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी
गेल्या आठवड्याभरात राज्यात पावसाळी वातावरण होतं. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, कालपासून राज्यातील तापमान बदलत आहे. मुंबईत कालपासून कोरडं वातावरण आणि तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे
No comments
Post a Comment