9 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - ट्रॅव्हल्स बस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
परभणी जिल्ह्यातील जिंतूर औरंगाबाद महामार्ग वर 15 किलोमीटर अंतरावर जोगवाडा पाटीजवळ खाजगी ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतला हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याने बस पूर्ण जळून खाक झालेली दिसून आली या बसमध्ये 12 प्रवासी होते ही ट्रॅव्हल्स औरंगाबाद कडून हिंगोली कडे जात होती दरम्यान बस ने पेट घेतल्याचे समजताच
त्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला नंतर हि खबर अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक पोहोचेपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाली होती
2. भंडार्याच्या बालमृत्यू अग्नितांडव्याच्या दोषींवर कारवाई करा
भंडार्याच्या बालमृत्यू अग्नितांडव चे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही होईलच पण ही घटना हृदय हेलावून टाकणारी आहे अशा दुर्दैवी व मनाला सुन्न करून टाकणाऱ्या या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या परिवारा सोबत राज्य सरकार आहे,शब्दाने हे दुःख कमी होणार नाही,आर्थिक मदत दिल्याने पण राज्य सरकार या सर्व परिवारांना लवकरात लवकर त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची साहाय्यता करणार असल्याचं भाष्य राज्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलय या घटनेत जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टर असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहेय.
3. मुख्यमंत्र्यांनी ‘त्या १९ मालमत्तां’ची माहिती लपवली
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यतील कोर्लेई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर चढविल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्षे त्यांनी वापरली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, ही माहिती लपविली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला
4. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते
तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती घेतली तर येथील जलविद्युत प्रकल्पाला हि भेट दिलीये.
5. पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर मागील काही महिन्यांपासून पुण्यातील न्यायालयीन कामकाज देखील महत्वपूर्ण आणि जलदगती खटल्यांपुरतेच सुरू होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व समाजजीवन व सरकारी कामकाज पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून सकाळी 11 ते दीड आणि दुपारी 2 ते 4.30 पर्यंत सुरू राहणार आहे.
6. संभाजीनगर' विषयावरच्या चर्चा आता थांबवा-बाळासाहेब थोरात
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नाही. ते आमचे अराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे 'संभाजीनगर' विषयावरच्या चर्चा आता थांबवा, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बजावून सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना संभाजीनगरच्या चर्चेबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता यावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महाराज आमचेही श्रद्धास्थान आहेत, यात काहीही शंका असण्याचे कारण नाही.
7. रत्नागिरीतील बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे 47 लाखांचा खर्च वाचला!ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद टाळण्यासाठी युवावर्गाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ आणि युवक यांच्यात गाव बैठकांमधून ताळमेळ घडून आणल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमधील तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी 40 हजार रुपये खर्च येत असून बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचे 47 लाख 60 हजार रुपये वाचले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यावर युवा वर्गाचा कल ग्रामपंचायतीत काम करण्यासाठी वाढला आहे. अगदी ज्येष्ठांनीही त्यांना मार्गदर्शन करत सहकार्याचा हात दिला. त्यामुळे जिल्हाभरात तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
8. उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
सोलापूर येथील शिवसेना नगरसेवकआणि नेते महेश कोठे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.यानंतर उद्धव ठाकरे यांनी महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते.महेश कोठे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पवार यांच्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले होते.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती . यानंतर काही तासातच शरद पवार यांच्या ट्विटर अकाउंट वरून महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश रद्द करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. .तर उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.महेश कोठे यांच्या सोबत १३ नगरसेवक असल्याचे म्हटले जाते
9. मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी
तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे होणाऱ्या जागतिक रेकॉर्डसाठी देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. मनपाच्या विद्यार्थिनींचे हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही, अशा शब्दांमध्ये नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींचा गौरव केला आहे.
10. 'मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर'
बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावात महापालिकेच्या वैद्यकीय सेवेतील ४० ते ५० टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक कबुली आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर असल्याची टीका करत महापालिका रुग्णालयात किती पदे रिक्त आहेत, ती पदे भरण्यासाठी प्रशासनाने काय कार्यवाही केली याबाबतची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली
No comments
Post a Comment