Breaking News

1/breakingnews/recent

7 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

       News24सह्याद्री - अकोल्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. अकोल्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा 
महाराष्ट्र राज्य संपादक आणि पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन अकोल्यातील गणेश घाट सिटी कोतवाली येथे करण्यात आले होतेय.  तसेच कोरोना काळात  कोरोणा योद्धा म्हणून  लढणाऱ्या पत्रकार,आरोग्य सेविका,सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोणा योद्धा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय.  

 2. पालकांची  जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव 
शाळा प्रशासनानं अन्यायकारकपणे शुल्कवसुलीचा आरोप फेटाळून लावलाय.यावर काहीही प्रतिक्रिया द्यायला शाळा प्रशासनाने नकार दिलाय.

3. नवदाम्पत्याचं अविहिरीत बुडून मृत्यू 
विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघ हि  तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने म्रुत्यु झालाय . घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देत येथील सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि  पोलिस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह  बाहेर काढण्यात आले

4. कोटी टोला येतीलव्यक्तीची  नक्षल्याकडून निर्गुण हत्या
नक्षलवाद्यांनी घरी येऊन विनोद मडावी, आई वडील व पत्नीला गावा बाहेरील जंगलात नेऊन वडीलांना बेदम मारहाण केली आणि   गोपीचंद मडावी याची  नक्षल्यानी धारदार चाकूने वार करून निर्घृणपणे  हत्या केली आहे.

5. जिजाऊंचा जन्मोत्सव चार दिवसांवर
विशेष म्हणजे चार दिवसांवर म्हणजेच 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मसोहळा असून यावर कोरोनाचे सावट आहे. कमी लोकांमध्ये सोहळा पार पाडण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.  यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालेले जिजाऊ जन्मस्थान पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली आहे.  

6. मुंबईमधील चेंबूर येथे झेरॉक्सच्या दुकानांना भीषण आग
मुंबईमधील चेंबूरच्या जनता मार्केटमध्ये झेरॉक्सच्या आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आलंय. आगीचं कारण अजून समजू शकलेले नाही. पण शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय.

7. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शुल्क आकारणीला सुरवात
बाह्य रुग्णांना येणाऱ्या शिंका, ताप, सर्दी, खोकला या साथीच्या आजारामुळे एकमेकांच्या हाताचा स्पर्श, वारंवार हाताळण्यात येणाऱ्या नोटा यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता  त्यामुळे हि  फी आकारणी बंद करण्यात आली होती. आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनामध्ये बैठक झाली. यावेळी या बैठकीमध्ये महापालिकेच्या 7 रुग्णालये व 28 दवाखान्यांमध्ये फी आकारणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय.

8. हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी
 महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद नेमके कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांचं नाव पोलीस महासंचालकपदी आज निश्चित झाले आहे.

9. पालघरमध्ये धोकादायक इमारतीत प्रसूती
 पालघर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी तसेच पालकमंत्री यांच्याकडून या प्रस्तावाबाबत कोणत्याही प्रकारची पाठपुरावा होत नसल्याचे दिसून आल्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

10. तारापूरमधील प्रदूषणकारी कारखाना बंद
कारखानदाराच्या उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधून निघणारे  रासायनिक सांडपाणी आणि  घातक घन कचऱ्याची विल्हेवाट मागील अनेक वर्षांंपासून राज्याच्या विविध भागात नैसर्गिक स्रोतांमधे लावली जात असल्याची बाब उघडकीस आली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्याने या कारखान्यांवर हि कारवाई करण्यात आली आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *