21 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. जयंत पाटलांनी सुप्त इच्छा केली व्यक्त
जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं,” असं म्हणत कारणांवरही भाष्य केलं. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे.
2. शिवसेनेकडून भाजपाचा समाचार
भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. त्यामुळे या वादाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याच वादाचा हवाला देत शिवसेनेनं भाजपाला धारेवर धरलं आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” अशा शब्दात शिवसेनेनं समाचार घेतला आहे.
3. थिबा संगीत महोत्सवा’चे उद्यापासून थेट प्रक्षेपण
आर्ट सर्कल, रत्नागिरी या संस्थेतर्फे येथील ऐतिहासिक थिबा राजवाडय़ाच्या भव्य प्रांगणात २२,२३ आणि २४ जानेवारी रोजी दररोज संध्याकाळी ७ वाजता हा वार्षिक संगीत सोहळा रंगणार आहे..
4. अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर
पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवकपद रद्द होईल. भाजपच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे. काही मिळालं नाही की माध्यमं अशा बातम्या पसरवात, असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नगरसेवकांच्या पक्षांतरांच्या चर्चांविषयी विचारलं असता मांध्यमांना सुनावलं होतं..
5. खासगीकरणाला विरोध करणारी मुंबईकरांची ‘बेस्ट’ भाडेतत्वावर बसेस घेणार
बेस्टने 400 बसेस कंत्राटदारकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आहे. कंत्राटदारांकडून घेतलेल्या बसेसवर ड्रायव्हर आणि कंडक्टरही कंत्राटी असणार आहेत. खासगीकरणाला विरोधाची भूमिका असताना या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे..
6. वीज बिलावर ऊर्जामंत्री राऊत बोलले, आता अजित पवार, काय होणार?
महावितरणने राज्यातील ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. थकबाकी न भरल्यास त्वरित वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या याच निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढीव वीज बिलावर तसंच सरकारच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे
7. ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड
कृपया लग्नाला येताना कपड्यांचे किंवा भांड्यांचे अहेर आणू नका”, असा मजकूर लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला लिहिलेला दिसतो. मात्र, कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेले नातेवाईकांना देखील वधू-वराला अहेर पाठवता यावेत यासाठी लग्नपत्रिकेवर चक्क गुगल पे आणि फोन पेचं क्यूआर कोड छापण्यात आला.
8. प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे कडवे हिंदुत्ववादी : उर्मिला मातोंडकर
हिंदू धर्मात सांगितलेल्या बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते, अशा शब्दात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं वर्णन केलं. पुण्यात ‘प्रबोधन’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात त्या बोलत होत्या.
9. आयपीएल चा यशस्वी गोलंदाज;मलिंगा मुंबई इंडियन्समधून बाहेर
मुंबई इंडियन्सनेही लसिथ मलिंगाला रिलीज केलं. यामुळे मुंबईच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. मुंबईने आपल्या हुकमाच्या एक्का का सोडला, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र मलिंगाने आगामी मोसमात खेळणार नसल्याची पूर्व कल्पना आधीच दिली होती. यामुळे मुंबईने त्याला रिलीज केलं
10. पुण्यातून अहमदाबाद, भूजसाठी विशेष रेल्वे सेवा
प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुण्यावरून अहमदाबाद, भूज आणि भगत की कोठी या ठिकाणांसाठी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे भगत कि कोठी या मार्गावर २४ जानेवारी पासून प्रत्येक रविवारी रात्री ८;३० वाजता गाडी सोडली जाईल.
No comments
Post a Comment