20 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - ग्रामपंचायत निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. शरद पवार येत्या 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात होणार सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 25 जानेवारीला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्सासाठी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्यावरून देशावासियांना संबोधित करतात. त्याच्याच ठिक दिवसाअगोदर शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहे.
2. जिंतूरची लेक अंजली कोला 'मिसेस एशिया युनिव्हर्स'ची मानकरी
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या 60 विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावून 'मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१'च्या किताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश प्राप्त केल्याने संबंध एशियामध्ये जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात अंजलीने पुनश्च एकदा मनाचा तुरा रोवला आहे,
3. गोंदियात बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका एसीबीच्या जाळ्यात
20 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाभार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काचे देयक तयार करून तिरोडा पंचायत समितीमध्ये पाठविण्याकरिता त्यांनी 21 हजार रुपयांची मागणी केली होती.
4. ग्रामपंचायत निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात लांबे वडगावला जोरदार धुमश्चक्री झाली.ग्रामपंचायत निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. तलवारी, कोयते, लाठ्या घेऊन हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणी मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे आदेश जारी
वीजबिले माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, कोणाचीच वीजबिले रद्द करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे आदेश जारी केले आहेत. जर तुम्ही वीजबिल भरले नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
6. कोल्हापूर-पुणे नवीन रेल्वेमार्गासंदर्भात पंधरा दिवसात अहवाल सादर करा
रेल्वे मार्गाने पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी सात तास लागतात आणि ते अंतर 340 किलोमीटर इतके आहे. सध्याचा रेल्वेमार्ग हा सरळ नसून वळणावळणाचा आहे. त्यामुळे प्रवासास विलंब होतो. पुण्याहून कोल्हापूरला रस्ता मार्गाने गेल्यास साडेचार तास लागतात आणि ते अंतर 230 किलोमीटर इतके आहे, असे राज्यमंत्री पाटील म्हणाले.
7. 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल
दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 85.20 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 75.38 रुपये प्रति लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 91.80 रुपये आणि 82.13 रुपये प्रति लीटर आहे. 1 जानेवारीपासून पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 1.50 रुपयांची वाढ झाली आहे. 2020 च्या दुसऱ्या सहामाहीतही पेट्रोलचे भाव वाढले होते.
8. लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक
एका गुन्ह्याची माहिती जालन्यातील चंदनजीरा पोलीस स्टेशनला मिळाली आणि एक धक्कादायक गोष्ट पोलिसांसमोर आली. पोलिसांनी बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.
9. गावकऱ्यांकडून विजयी लेकीची थेट घोड्यावरुन मिरवणूक
नागपूर जिल्ह्यातील उमेरड तालुक्यातील शीतल सहारे हिची घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. शीतल सहारे यांच्या विजयानंतर गावकऱ्यांनी केलेला जल्लोष चर्चेचा विषय ठरत आहे. शीतल सहारेच्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
10. तीन दिवसात सोन्याचा भाव वाढतोय
नागपूर, नाशिक आणि पुण्यातही सोन्याचा दर 49,010 रुपयांच्या आसपासच आहे. काल मुंबईतील सोन्याचा दर हा 49,000 रुपये प्रतितोळा इतका होता. हा ट्रेंड काय राहिला तर आगामी काही दिवसांत सोन्याचा दर पुन्हा प्रतितोळा 50 हजारांपलीकडे जाईल.
No comments
Post a Comment