Breaking News

1/breakingnews/recent

15 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

      News24सह्याद्री - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट
याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

2. पहिल्यांदाच शेतकरी- केंद्र सरकार आमने-सामने
आज दुपारी 12 वाजता शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या होणारी ही पहिलीच बैठक आहे.  

3. महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नी नसते
प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही', या शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे वक्तव्य करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही.

4. धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांचे मौन
 त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धनंजय मुंडेंवर बदनामीचं संकट ओढवलेलं असताना बहीण पंकजा मुंडे गप्प असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

5. शरद पवार व विश्वास नांगरे पाटील भेटीवर निलेश राणेंच प्रश्न चिन्ह
 मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा,सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारले आहेत.

6. ईडीच्या नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी 55 लाख रुपये परत केले. त्यामुळेच त्या ईडीच्या रडारवर आहेत

7. बीजेपी नेते अतुल भातखळकर यांची शरद पवारांवर खोचक टीका
राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री?  राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” अस अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

8. लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांची घोषणा 
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना तसेच गरोदर महिलांना सोबतच एँलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.  

9. लावण्या पाटील या तरुणीने ब्युटी विथ पर्पज" सरताज पटकावला
तिला मिळालेल्या यशानंतर तिने प्रथमच एम.आय.डी.सी.विभागातील कमलधाम वुध्दाश्रमाला भेट दिली.व वुध्दाश्रमातील वयोवृद्ध नागरीकांचा आर्शिवाद घेतला. यावेळी अंबरनाथ च्या जेष्ट समाजसेविका पोर्णिमा कबरे,उपस्थित होत्या.

10. जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं
 जामनेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून रात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाला आहे. पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *