Breaking News

1/breakingnews/recent

10 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री - औरंगाबादेत 'मास्क' न वापरणाऱ्यांनी भरला '70' लाखांचा दंड...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. ख्यमंत्र्यांनी  दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची केली पहाणी
कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. हे सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करून  नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन केले  

2. राज ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात
 विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

3. रुग्णालयात आगरोधक व्यवस्था उपलब्ध नाही  
६ महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचं चित्र समोर आलंय तर मेडिकल कॉलेजच्या एन.आय.सी.यु.अतिदक्षता विभागामध्ये मेडिकल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फायरिंग ऑडिट 2016 रोजी दोन करोड रुपयांच्या संपूर्ण आराखडा सरकारला पाठवलेला आहे पण तो अजूनही मंजूर नसल्यामुळे या ठिकाणी ती सुविधा देण्यात आलेली  नसल्याचं समोर आलाय 

4. निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने उमेदवाराने चक्क ऑटोच ठेवला घरावर, 
 मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणत असतात असाच एक अनोखा फंडा  जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एक उमेदवाराने आजमविला आहे. या उमेदवाराच्या  मुलाने  निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने ऑटोच घरावर नेऊन दर्शनी भागात ठेवल्याचं पाहायला मिळतंय 

5. बीएमसीकडून कोट्यवधींच्या मालमत्ता कराची वसुली थकीत
तब्बल  1600 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 करबुडव्यांची यादी समोर आलीये  मुंबई महापालिकेचा कर बुडवणाऱ्या करबुडव्यांच्या यादीमध्ये म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरए सारख्या सरकारी कार्यालयांचाही समावेश आहे.

6. मुंबईत दिवसभरात ५९५ जणांना कोरोना संसर्ग
गेल्या २४ तासांत मुंबईत ५९५ करोनाबाधित आढळले, तर ८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शनिवारी नऊ मृतांची नोंद झाली. शहरात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्य़ांवर पोहोचला असून, सध्या ७६७८ रुग्ण उपचाराधीन आहेत.  

7.  लातूरमध्ये 128 गावरान कोंबड्यांचा मृत्यू
मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी इथे १२८ गावरान कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

8. शेतकऱ्यांना शासनाकडून 1,303 कोटींची मदत जाहीर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 7 जानेवारी रोजी शासनाने 1303 कोटी 49 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल असा दावा विभागीय प्रशासनाने केला आहे.  मराठवाड्यासाठी हा निधी जिल्हानिहाय देण्यात आला आहे.

9. औरंगाबादेत 'मास्क' न वापरणाऱ्यांनी भरला '70' लाखांचा दंड
कोरोनाला हरवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर बंधनकारक असतांना, मात्र शहरात अनेक जण विना मास्क फिरत आहे. महापालिकेने 8 महिन्यात 14 हजार 96 नागरिकांकडून तब्बल 70 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

10. पुण्यात फसवणूक करण्याचा नवा प्रकार
फोनवरुन भावना चाळवल्यानंतर हाय प्रोफाईल   फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *