सह्याद्री ब्रेकिंग - भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा शिर्डीत गनिमीकाव्याने प्रवेश
News24सह्याद्री -
शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे असे बोर्ड लावून त्याची सक्ती करण्यात आली होती अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे असे म्हणुन तृप्ती देसाईंनी विरोध केला होता हे बोर्ड काढावे म्हणून तुप्ती देसाई पुण्यावरून शिर्डी कडे निघालाय होत्या मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पुन्हा पुण्याला रवाना करण्यात आले होते तर शिर्डीतील ग्रामस्थांनी सुद्धा तृप्ती देसाई यांच्या विरोधात शिर्डीत आंदोलन केले होते .परंतु संस्थानने आणि ग्रामस्थांनी बोर्ड न काढण्याची भूमिका घेतली होती.
तृप्ती देसाई किंवा भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन बोर्ड काढू नये म्हणून बोर्ड उंचावर लावण्यात आले होते,मात्र अखेर भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या बोर्डला काळे फासले त्या मुले मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता आधी हा प्रकार काय चाललंय हे कोणाच्याच लक्षत आले नव्हते मात्र भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे समजल्यावर शिर्डी मधील ग्रामस्थांनी मंदिरा कडे धाव घेतली होती
No comments
Post a Comment