सह्याद्री ब्रेकिंग - विकी चंद्रलाल लालवाणीने केली विनापरवाना वसुली
News24सह्याद्री -
छावणी मंडळाची १०,२०,२५, ५१० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विकी चंद्रलाल लालवाणी याच्याविरुद्ध भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० कोटी २० लाख २५ हजार पाचशे दहा रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार भिंगार छावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भिंगार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. मयत झालेल्या व्यकितीच्या नावे ठेका चालवत आणि या बाबत भिंगार छावणी मंडळाला कुठलीही कल्पना न देता, 9 महिने, विनापरवाना छावणी कर नाक्यावर वसुली करून, सुमारे 10 कोटी रक्कमेचा अपहार केला असल्याचा ठपका भिंगार छावणी मंडळाने विकी चंद्रलाल ललवाणी याच्यावर ठेवला आहे.
No comments
Post a Comment