17 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास काही डॉक्टरांचाच नकार !....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. दिवसभरात ६४ टक्के जणांनी घेतली लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. दरम्यान, दिवसभरात ६४ टक्के जणांनी लस घेतली तर मुंबईत ५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस देण्यात आली.
2. राज्यात दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कारण, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये ६० टक्के कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्याचबरोबर दररोजच्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही आज घट झाली असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
3. जेश टोपे यांचा पुन्हा तक्रारीचा सूर
महाराष्ट्राला १७.५० लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे १० लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे राजेश टोपे म्हणाले.
4. कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका
“आपले पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेले आहेत व ते आता शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघाले आहेत. परंतु आपण त्यांचे गुलाम होणार नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क कायम ठेवणार आहोत व हे कायदे नष्ट करण्यास सरकारला भाग पाडणार आहोत.” असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटलं
5. सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राष्ट्रवादीच्या कार्येकर्ता मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय. खासदार सुप्रिया सुळेंसोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय.
6. स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास काही डॉक्टरांचाच नकार
परंतु तेथे स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याचे समजल्यावर काही डॉक्टर या केंद्रातून आल्या पावली परतले. त्यामुळे स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेबाबत डॉक्टरांनाच खात्री नसल्याची चर्चा सुरू होती
7. उल्हासनगरात कोविड 19 लसीकरण ला सुरुवात.
मनपा आयुक्त व महापौर यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
8. फि सवलती साठी होली एंजल्स शाळेवर पालक व मनसे चा मोर्चा
मनसेने आठ दिवसाचा कालावधी शाळा व्यवस्थापनला दिला असून पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र करू असा इशारा मनसेचे मनोज घरत यांनी दिला आहे.
9. नकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार
मुंबईत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करत प्रवाशांचे नकली ओळखपत्र बनवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जातात. अशाप्रकारे तिकिटांच्या विक्री करणाऱ्या 5 दलालांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथील रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 70 तिकिटे जप्त करण्यात आली आहे. याची किंमत सव्वा लाख रुपये आहे.
10. ठाण्यातील शाळा कधीपासून सुरु होणार?
ठाणे जिल्ह्यातील शाळा अद्याप सुरु होणार नाहीत, असे संकेत दिसत आहेत. ठाणे महापालिकेने परिपत्रक जारी करत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंदच राहतील, असं परिपत्रकात म्हटलं आहे
No comments
Post a Comment