Breaking News

1/breakingnews/recent

सामन्या आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का: ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

No comments

 


मुंबई -

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अश्या तिसऱ्या कसोटी नंतर 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये  खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोव्हसकी चौथ्या कसोटीबाहेर झाला आहे. पुकोव्हसकीच्या जागी मार्कस हॅरिसला संधी देण्यात आली आहे. आयीसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

पुकोव्हस्कीने भारताविरोधातील सिडनीतील तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केले होते. या पदार्पणातील सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले होते. मात्र आता पुकोव्हस्कीने बाहेर झाला आहे. यामुळे चौथ्या कसोटीत कांगारुंची सलामीला नवी जोडी दिसणार आहे. पुकोव्हस्कीचं गुरुवारी 14 जानेवारीला फिटनेस चाचणी करण्यात आली. यामध्ये तो अपयशी ठरला. पुकोव्हस्कीला खांद्यात दुखापत झाली आहे. पुकोव्हस्कीला ही दुखापत सिडनी कसोटीत झाली होती. या दुखापतीमुळे मार्कस हॅरिसला संधी मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही जोडी चौथ्या कसोटीत सलामीला येण्याची शक्यता आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *