13 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना लसीचे दर सर्वात कमी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशभरात मागील २४ तासांत १५ हजार ९६८ नवे करोनाबाधित
१७ हजार ८१७ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. देशाताली एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ४ लाख ९५ हजार १४७ वर पोहचली आहे.
2. जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना लसीचे दर सर्वात कमी
देशात कोवॅक्सिन आणि कोविशील्ड अशा दोन लसींच्या आपातकालीन वापराला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. इथं महत्त्वाची बाब अशी, की जगभरातील इतर लसींच्या तुलनेत भारतात लसींचे दर अतिशय कमी ठेवण्यात आले आहेत.
3. कृषी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते का? – राहुल गांधी
“कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान.” असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वटिद्वारे म्हटलं आहे.
4. नवापूरच्या कुक्कुटपालन व्यवसायाला फटका
२००६ मधील बर्ड फ्लूच्या फेऱ्यात नवापूरमध्ये कुक्कुटपालन व्यावसायिकांचे ३५ कोटींचे नुकसान झाले होते. बर्ड फ्लूच्या धास्तीने सध्या अंडे, कोंबडी विक्री मंदावली असून आधीच अडचणीत आलेल्या या व्यवसायाला दुहेरी फटका बसला आहे.
5. नागपुरात डीजेच्या आवाजामुळे कोंबड्यांचा मृत्यू?
राज्यात बर्ड फ्लूचे संकट आले असतानाच आता नागपुरात डीजेच्या दणदणाटामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. याबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकली नसली तरी पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचा मृत्यू हा डीजेच्या आवाजामुळेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे
6. अभिनेता सोनू सूदनं शरद पवारांची घेतली भेट
शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती
7. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
8. मुंबईत पेट्रोल नव्वदी पार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. पूर्वीच्या दरांच्या तुलनेत आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 90 रुपयांच्या पार गेले आहे. त्यामुळे मुंबईतकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
9. रागातून मित्राची गाडी पेटवली
दुचाकींना लावण्यात आलेल्या आगीमुळे काही काळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पैशाच्या वादातून ही वाहनं पेटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
10. 'कोविशिल्ड लस मुंबईत दाखल
मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.
No comments
Post a Comment