भजनसम्राट अनुप जलोटा यांच चित्रपट क्षेत्रात पदार्पण
मुंबई -
भजनसम्राट अनुप जलोटाने सत्य साई बाबांवर आधारीत असलेला चित्रपट साइन केलाय. या चित्रपटात अनूप जलोटा हे सत्य साई बाबांची प्रमुख भूमिका साकारणार असून साई बाबांची भूमिका करायला मिळत असल्यामुळे अनूप जलोटा यांनी आनंद व्यक्त केला. अनुप जलोटा यांनी सत्य साई बाबांसारखा गेटअप करून काही फोटो ही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्या फोटोत अनूप जलोटा हे हुबेहुब सत्य साई बाबांसारखे दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्की रनौत हे करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले असून आता अनूप जलोटाच्या या लूकची खूप चर्चा ही रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
No comments
Post a Comment