Breaking News

1/breakingnews/recent

''अरे काम करू की सत्कार स्वीकारत फिरू''?: प्रवक्त्यावंर दादा डाफरले

No comments

 



मुंबई -

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भडकले यांच्या शीघ्र कोपी स्वभावाचे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच दर्शन झाले. अजितदादांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर दादा डाफरले. अरे कामं करू की सत्कार स्वीकारत फिरू?, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावले. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजितदादांचा पारा चढला. काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचे संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली ते भडकले. 

एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महापालिका निवडणुका येत आहे. या निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा. आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर भर द्या. त्यासाठी पक्षबांधणी करा. आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन अजितदादांनी केले. दरम्यान, एकीकडे पालिका निवडणुका एकत्रित लढण्यावर अजितदादा पवार भर देत आहे. दुसरकडे कार्यकर्त्यांना निवडणुकीत घड्याळ चालवण्याच आवाहनही करत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *