Breaking News

1/breakingnews/recent

धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे राजीनामे घेतले जाणार का? - जयंत पाटील

No comments



मुंबई -

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंडे आणि रेणू शर्मा हे प्रकरण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिक यांच्या जावयावरील अटकेची कारवाई तसेच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाची चर्चा अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडली. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे राजीनामे घेतले जाणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणे ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्ष स्तरावर योग्य ती चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु नवाब मलिक यांच्याबाबतीत बोलायचे गेल्यास त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांना यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” सांगत जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *