Breaking News

1/breakingnews/recent

सोलापुरात शिवसेनेला धक्का, महेश कोठे यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय

No comments



 मुंबई -

सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थिती मध्ये कोठे हे राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे कोणतीही अट न ठेवता आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असलो तरी आमदारकीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होईल,असा आशावादही कोठे यांनी बाळगला आहे.असे कोठे म्हणाले. महेश कोठे यांनी यापूर्वी २००९ साली सोलापूर शहर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटिवर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली होती. 

त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी झुंज देताना कोठे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. त्यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची माळही घालण्यात आली होती. मात्र दोनवेळा पराभव होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी मागील २०१९ साली शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी हाती घेतली असता शिवसेनेने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापले. एव्हाना, २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोठे यांनी सेनेच्या नगरसेवकांची संख्या ८ वरून थेट २१ वर वाढवून शहरात स्वतःसह सेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतून हकालपट्टी झाली तरी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच शाबूत राहिले होते.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *