मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेनामी मालमत्तेची माहिती लपवली - किरीट सोमय्यां
मुंबई -
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माहिती लपवल्या बाबत गंभीर आरोप केले आहे. ठाकरे सरकार काहीही करू शकते. इंग्रजांच्या काळातील 99 वर्ष करारावर देण्यात आलेल्या जमिनी 999 वर्ष करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा 999 केली. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याला देत आहे. तिथे जाण्याचा रस्ताही आमचाच आहे असे ते म्हणत आहे. शरद पवारांचे जवळचे आणि ठाकरे परिवारांचे मित्र शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका यांच्यावर ठाकरे सरकार मेहेरबान आहे.
शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्रावरून महापालिकेने 200 कोटी रुपयांचे टीडीआर दिले आहे. ठाकरे सरकारने हायकोर्ट, पुरातत्व विभाग आणि महापालिकेचा निर्णय बाजूला सारत 200 कोटी रूपयांचे डेव्हलपमेंट राईट्स आपल्या बिल्डर्स मित्रांना दिले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशाने 200 कोटी रूपयांचा फायदा बिल्डर्सला दिला जात आहे. या बिल्डर्सला देण्यात आलेला 999 वर्षांचे करारपत्र दाखवावंच असे माझं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती देताना आपल्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. अन्वय नाईक यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची 23 हजार 500 चौरस फूटांची 19 घरेआहे. ही एकूण 5.29 कोटींची बेनामी मालमत्ता आहे.
No comments
Post a Comment