महापालिका निवडणुकीसाठी नवनिर्माण सेनेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक होणार
मुंबई -
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता वांद्रेतील MIG क्लब इथे ही बैठक होणार असून. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरुपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहे. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
No comments
Post a Comment