राज्य सरकार ज्या भावनेनं काम करत आहे, वागत आहे त्याचा उद्देश काय आहे - रावसाहेब दानवे
मुंबई -
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात आली. राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शंका उपस्थित केली आहे. भाजप महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणीसाठी लोणावळ्यात आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविषयी रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले राज्य सरकार ज्या भावनेन काम करत आहे. वागत आहे. त्याचा उद्देश काय आहे, हे मला माहित नाही. त्यांनी अनेकांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचे संरक्षण पोलीस करतात असे नाही. आमचे संरक्षण या राज्यातील जनता करतेय. सुरक्षा हटवल्याने आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ असे नाही. सुरक्षा हटवण्याच कारण त्यांनाच माहिती आहे. असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.
No comments
Post a Comment