Breaking News

1/breakingnews/recent

सहा महिने काय ते झोपा काढत होते का? - चंद्रकांत पाटील

No comments



 मुंबई -

चंद्रकांत पाटील म्हणाले की सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहे की हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे.असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर आज टीका केली. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपा नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. 

या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर जर देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि त्यांनी हे काय नाटक सुरू आहे? आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असं म्हटलं नाही तर त्यांचं(विरोधकांचं) खरे  होईल.असेही पाटील म्हणाले. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *