Breaking News

1/breakingnews/recent

औरंगाबादचे नामांतरावर अजितपवारांची स्पष्ट भूमिका

No comments



मुंबई -

राज्यात गेल्या काही दिवसानपासून नामांतराचा विषय चांगलाच रंगला आहे. औरंगाबादचे नामकरण करत संभाजीगर व्हावे अशी मागणी होत आहे. शिवेसना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केंद्र सरकारकड करत आहे दुसरीकडे काँग्रेसचा याला पूर्णपणे विरोध दर्शवला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असे ते म्हणाले दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भूमिका मांडली आहे.महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आले. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की कोणी काय मागणी करावे हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढते, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलते. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागते. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावे ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचे समर्थन करुन पुढे जात आहोत. असे अजित पवार म्हणाले 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *