Breaking News

1/breakingnews/recent

मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का?: नारायण राणे

No comments

 



मुंबई -

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झाले असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी नवे कृषी कायदे आणले आहे. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झाले? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचे तसंच न्याय देण्याचे कोणतंही काम सध्याचे सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बसचही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील असा टोला नारायण राणे यांनी लगावला. हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचे एकही काम या सरकारने केलेले नाही आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचले असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचे आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे? अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहे. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातील लोक एकत्र आले आहे. भाजपाला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु आहे. असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *