महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी लसीचे डोस मिळाले: राजेश टोपे
मुंबई -
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात की राज्यात एकीकडे कोरोना लसीकरणाची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले आहे. असा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस मिळाले आहे” असा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोना लस महाराष्ट्रात आली असून १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. याबद्दल राजेश टोपेंनी बोलताना सांगितले की, मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना अपलोड केले आहे त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल.
No comments
Post a Comment