बर्ड फ्ल्यूच्या शिरकाव मुळे अंडी, चिकन खाणाऱ्यांना महत्वाची सूचना - सुनिल केदार
मुंबई -
कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच त्याच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाल्याच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवले तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढेच आव्हान आहे की तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवले पाहिजे.
असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल. असे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी आढावा बैठक घेणार आहे. ठाणे, दापोली परभणी व नागपूर येथील नमूने आणलेले आहे. अद्याप केवळ परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येने बाकी असल्याची माहिती केदार यांनी यावेळी दिली. केंद्र शासानाने देखील याबाबत थोडे सतर्क होणे गरजेचे आहे. राज्याने जरी काही केले तरी केंद्राला देखील त्यांची भूमिका पार पाडवी लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने स्वतःची अत्यंत आधुनिक अशी प्रयोगशाळा जिथे सर्व नमूने तपासले जातील व उद्या आम्हाला भोपाळला जाण्याची गरज पडणार नाही.
No comments
Post a Comment