Breaking News

1/breakingnews/recent

भंडारा दुर्घटना आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

No comments




मुंबई -

भंडारा येथील घडलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आज दुपारी मुख्यमंत्री दाखल भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांचा आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे होते. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. 

त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहे. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहे. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *