Breaking News

1/breakingnews/recent

पंतप्रधान किंवा मी मंत्री म्हणून ट्विटरचे अकाऊण्ट हॅण्डल करत नाही

No comments



मुंबई -

राज्यामध्ये औरंगाबादच्या नामांतरणावरुन महाविकास आघाडीत मोठा बिघाड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. त्यामुळे या नामांतरणाच्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. मात्र ट्विटमध्ये औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख झाल्याप्रकरणी आता स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसकडून उघडपणे विरोध केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांकडून या मुद्यावरून शिवसेनाला सूचक इशाराही देण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमित देशमुख यांचा फोटो देखील वापरण्यात आलेला आहे.

मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कधी कधी टायपिंग एरर असते किंवा एखाद्या व्यक्तीने लिहून दिलेले असते. त्यामुळे चूक होऊ शकते. त्यामुळे हे ट्विटर अकाऊंट हॅण्डल करणाऱ्याला समज देण्यात येईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मी मंत्री म्हणून ट्विटरचे अकाऊण्ट हॅण्डल करत नाही. ज्या ट्विटर हॅण्डल करणाऱ्याकडून चूक झालीय त्याला समज देण्यात येईल असे शेख यांनी सांगितले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *