Breaking News

1/breakingnews/recent

12 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - अकोल्यातील दहीहंडा येथे रुपनाथ महाराज संस्थांनमध्ये भव्य दिव्य घंटा बसवणार....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1, सरकारकडून कोरोना लसींंच्या 6 कोटी डोसची ऑर्डर

 देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सरकारने सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकला सहा कोटींहून अधिक लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे.  आज गुजरातमध्ये लसींची पहिली बॅच दाखल होणार आहे.या ऑर्डरची एकूण किंमत जवळपास 1300 कोटी रुपये इतकी आहे. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.  

2. डोंबविलीत इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
देशात पट्रोल-डिझेल चे भाव हे गगनाला भिडले आहेत.  इंधर दर वाढीमुळे सर्व वस्तूच्या किमतीमध्ये मध्ये देखील वाढ होत आहेत. व या सर्वांची झळ ही सामन्य नागरिकांना बसत आहे. काही दिवसात पेट्रोल च्या किंमती या ९० रुपये पर्यन्त पोहचल्या आहेत. या इंधन दरवाढी विरोधात डोंबिवली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून रस्त्यावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. व लवकरात लवकर इंधनदर वाढ कमी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्याकडून करण्यात आली.

3. उल्हासनगरात विषारी केमीकलच्या दुर्गंधीने नागरिकांत भीतीचे वातावरण
उल्हासनगर नंबर चार व पाच परीसरात वालधुनी नदीतुन केमीकलयुक्त विषारी दुर्गंधीने नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीत केमीकल रसायन सोडणा-या त्या इसमा विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष रोहीत साळवे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. उल्हासनगर शहरालगत वाहणा-या वालधुनी नदीत सायंकाळी कोणीतरी अज्ञात ईसमाने विषारी केमीकल मिश्रीत रसायन सोडल्याने उल्हासनगर नंबर चार व पाच परीसरातील नागरीकांना अचानक मळमळ,डोळ्यांंची जळजळ,उलट्यांचा त्रास होवु लागल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काँग्रेसचे अध्यक्ष रोहीत साळवे यांनी लागलीच पोलीस,प्रदुषण नियंत्रण मंडळ,अग्निशमन विभाग,महानगरपालिकेच्या अधिका-यांना माहिती दिल्यावर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर ठीकाणी पाण्याने नदीकाठचा परीसर साफ केल्याने पुढील अर्नथ टळला. सदरच्या टँकर माफीयावर व केमीकल सोडणा-या कारखान्याच्या मालकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी रोहीत साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

4. पत्री पूलाचे काम अंतिम टप्प्यात - खासदार श्रीकांत शिंदे 
कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकर वाहतूकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. पत्री पूलाच्या कामाची पाहणी खासदार शिंदे यांनी केली. पत्री पूलाचा गर्डर रेल्वे पोर्शनवर टाकल्यानंतर 700 मीटरचे पूलाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. स्लॅबचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पोहच रस्ताचे कामही पूर्ण होत आले आहे. पत्री पूलाच्या कामात अनेक तांत्रिकअडचणी होत्या. त्यावर मात करुन हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकर हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले. 

5. जालना तालुक्यातील वाघुळ घाटात 70 लिटर डिझेल चोरीला
जालना तालुक्यातील वाघूळ घाटात ड्राइव्हर सलमान शेख रफिक यांची गाडी बंद पडली. त्यामुळे त्यांनी घाटातच थाम्बण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हर शेख झोपले असताना दोन अज्ञात इसमाने गाडीतील ७० लिटर डिझेल चोरले. ड्राइव्हर शेख यांच्या फिर्यादीवरून त्या अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ३७९ व ३४ नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक उगले यांनी कामगिरी करून अवघ्या २४ तासात आरोपीना बेड्या ठोकल्या. रमेश  मगरे आणि राममूर्ती जोनवाल अशी आरोपींची नवे आहेत तर यातील एक फरार आहे.  

6. श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान तालुका कार्यालयाचे उदघाटन पार 
अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिर सर्वाच्या सहभागाने साकारणार आहे. संपुर्ण देशात निर्माण निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे . हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर  निर्माण निधी समर्पण अभियान तालुका कार्यालयाचे ऊद्घाटन हरिभक्त परायण गाथा मुर्तीचे गंगापूर येथे श्री तुळजाभवानी मंदीर शेजारी ह.भ.प रामभाऊ महाराज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले

7. अकोल्यातील दहीहंडा येथे रुपनाथ महाराज संस्थांनमध्ये भव्य दिव्य घंटा बसवणार 
अकोल्यातील दहीहंडा येथील रुपनाथ महाराज संस्थांनमध्ये भव्य दिव्य घंटा बसवला जाणार असल्याची माहिती संस्थांनचे अध्यक्ष गणेश पोटे यांनी पत्रकार परिषदेत दिलीये. तब्बल 321 किलोचा हा घंटा असून,असा भव्य घंटा भारतात दुसरा असल्याचा दावा अध्यक्षांनी केला आहे. पंचधातूंचा हि घंटा 3 लाख 50 हजार रुपये किमतीची आहे. याची ध्वनी 3 किलोमीटर पर्यंत जात असून, या अजस्त्र घंट्याची किमया म्हणजे याचा ध्वनीस्वर ओम असा येतोय असाही दावा संस्थेचे अध्यक्ष यांनी केला आहे. तसेच येत्या १५ दिवसात हि घंटा संस्थानांवर बसवली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पोटे यांनी यावेळी दिली. 

8. ट्रकच्या चाकाखाली दुचाकीस्वार ठार
औरंगाबाद मधील वाळूज गावात  ट्रकच्या चाकाखाली सापडुन दुचाकीस्वार कामगार ठार झाल्याची घटना वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली. या अपघातात हरिभाऊ लक्ष्मण पंडीत हे गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यु झाला. घरी परतत असताना औरंगाबाद-नगर महामार्गावर वाळूज पोलिस ठाण्यासमोर हरिभाऊ पंडीत यांच्या दुचाकीला ट्रकचा धक्का बसुन त्यांच्या अंगावर ट्रकचे चाक गेल्याने चेंदामेंदा होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. पोलिस ठाण्यासमोर अपघात झाल्याचे दिसतात सहायक पोलिस निरीक्षक , उपनिरीक्षक , सहायक फौजदार , पोकॉ. यांनी घटनास्थळ गाठुन मदत केली. यानंतर मयत कामगार हरिभाऊ पंडीत याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवुन ट्रक चालकास ताब्यात घेतले. या अपघात प्रकरणी संबधित ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.  

9. अ-हेर नवरगाव ग्रामपंचायत उमेदवारांचा प्रचार शांततेत
येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांनी आपापल्या आराध्य दैवताला नारळ फोडून प्रचार कार्याची सुरुवात केली.  ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण पाच प्रभागातून 13 वॉर्ड उमेदवार जनतेला निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग क्रमांक एक व पाच यामध्ये दुहेरी काट्याची लढत असून प्रभाग क्रमांक दोन,तीन तर चार मध्ये तिरंगी लढत आहे.आणि पहिल्यांदाच बच्चू कडू यांची प्रहार समर्थक संघटना निवडणूकीत उभी असून या पॅनलमध्ये नव चैतन्याचे उमेदवार आप आपली शक्ती पणाला लावून उभे ठाकले आहेत.

10. लॉकडाऊनच्या काळात मोबाईल लांबविणारे चोरटे कैद
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत  लॉकडाऊनच्या काळात महागडे मोबाईल लांबीवणाऱ्या दोघा चोरट्यांना काल एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. अशोक गुळे व कृष्णा चक्रे अशी हि आरोपींची नवे आहेत त्यांच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमंतीचे १५ मोबाईल पोलिसांनी जप्त केले. आरोपी अशोक गुळे व कृष्णा चक्रे यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे हे करीत आहे.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *