Breaking News

1/breakingnews/recent

8 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. सायबर तज्ञांकडून डोंबिवलीकरांचे प्रबोधन
 डोंबिवली करांनी सहभाग घेतला होता हॅकर्स सर्वसामान्य व्यक्तीची फसवणूककरून बँक खात्यातुन चोरी करतात  मात्र आपण काही नियमांचं पालन केल्यास  यावर अंकुश बसू शकतो अस मत तज्ञानी व्यक्त केले आहे.

2. विजेच्या पोलचा धक्का लागून एका भाजी विक्रेत्यांचा मृत्यू 
एका भाजीविक्रेत्याचा  जागीच मृत्यू झाला साधिराम असं या मृत व्यक्तीच नाव आहे  एमएसइबी च्या अनेक ट्रान्सफॉर्मरच्या गेट ला टाळे नसते त्यामुळे कचरा होऊन अनेक वेळा आगीसुद्धा लागण्याचे प्रकार होतात यामुळे एमएसइबी चा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

3. ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबीर 
पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आला राज्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासत होती ह्याची गांभीर्यता लक्षात घेता रक्तदान शिबिर राबविण्यात आले 
4. उल्हासनगरामध्ये  पोलीस वर्धापन दिन सप्ताह
2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर,आरोग्य शिबीर,वूक्षारोपण,अनाथ आश्रमातील मुलांना मिठाई वाटप,पथनाट्य, आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व श्रीकांत धरणे यांनी दिली

5. ईमारतीच्या भुखंडावरील वन विभागाची नोंद कमी, नागरीकांनी मानले आभार
आमदार डॉ. बालाजी किणीकर व गृहनिर्माण संस्थेतील रहिवाश्यांकडे सुपूर्द केला.यावेळी ईमारतीतील पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी यांंनी आमदार डॉ.बालाजी कीणीकर यांचे आभार मानले आहे.

6. परळीत धनंजय मुंडेंचा पंकजांना धक्का
 भाजपचे हे तीनही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे.  
7. राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे
 ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे  

8. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनास सरकारची परवानगी
 महाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा पुन्हा गाजणार आहे. परंतु त्यांना सर्व कोरोना संबंधित शासकीय आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कुस्ती स्पर्धेला परवानगी दिल्यामुळे राज्य कुस्तिगीर परिषदेनंही सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.  

9. गडकरींच्या दोन मोठ्या राजकीय भेटी
गडकरींनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली  

10. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भीषण आग
 प्रकल्पग्रस्त भडकले असून, त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या गेट वरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली . पण ही आग नेमकी कशी लागली हे अद्यापही समजू शकलेले नाही.    

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *