सुशांतचे स्वप्न पूर्ण करणार दिग्दर्शक अभिषेक कपूर
मुंबई -
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला आपल्यातून जाऊन आता आठ महिने उलटले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही सुशांत जिवंत आहे. सुशांत चा आज 35 वा वाढदिवस आहे.
सुशांतने त्याच्या डायरीत लिहिलेली अनेक स्वप्ने पूर्ण झाली नसली तरी आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त्ताने त्यातील एक स्वप्न केदारनाथचे दिग्दर्शक आणि सुशांतचे खास मित्र अभिषेक कपूर पूर्ण करणार आहेत .सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला आहे. त्यांनी सुशांतच्या वाढदिवशी झाडे लावण्याचे नियोजन केले असून ते आज 1000 झाडे लावणार आहेत.
No comments
Post a Comment