फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार
मुंबई -
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. कीर्तीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे काळी साडी, हलव्याचे दागिने अशी साग्रसंगीत तयारी करण्यात आली आहे. जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसांचं काऊण्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत.
No comments
Post a Comment