पीडित कुटुंबासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई -
भंडारा दुर्घटना येथे जिल्हा समान्य रुग्णालयातआग लागल्याने इथे भीषण आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भेट दिली असता आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो, अशा शब्दांत या सुन्न करण्याऱ्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
आज आम्ही या पीडित कुटुंबांना भेटलो यावेळी त्यांचे सांत्वन करताना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय आमच्याकडे कुठलेही शब्द नव्हते. या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. पण ही दुर्घटना अचानक घडली की आधी अहवाल आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले गेले हे तपासले जाईल. संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयांचे लवकरात लवकर सेफ्टी, फायर ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण एक चौकशी टीम तयार केली आहे. चौकशीत कुठलीही कसर राहणार नाही. तर त्यात कोणी जबाबदार असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
No comments
Post a Comment